‘जादू तिची गुलाबी’ या नव्या संग्रहात धीरज पुन्हा नव्याने अवतरताे आहे. प्रेमभावना ही जगात श्वास घेणार्या प्रत्येकात असते. ती ज्याला स्पर्शते ताे आयुष्यभर एका अनाेख्या धुंदीत जगत राहताे. ज्याला हा प्रेमभाव स्पर्शत नाही, ताेही या स्पर्शासाठी आयुष्यभर प्रतीक्षेतच असताे. स्पर्शणार्या आणि अस्पर्शणार्या भावनांचा एक रिमझिमणारा पाऊस या कवितेच्या पानापानावर बरसताे आहे. या पावसाला धुंद करणारी तिची गुलाबी जादू या संग्रहात तर आहेच पण त्या पावसाचा कैफ पुन्हा-पुन्हा प्यावा असेही धीरजला वाटते.




Reviews
There are no reviews yet.